भाऊ रागावला चिमुकली बहिणीने असे म्हणाली सॉरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  भाऊ आणि बहिणीचे प्रेम खूप खोल आहे आणि दोघेही एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. पण त्यांच्यातील भांडणांबद्दल काही वेगळं सांगायला नको. या व्हिडीओमधील चिमुकली अविरा 18 महिन्यांची आहे आणि तिचा भाऊ विहान 11 वर्षांचा आहे. तेव्हा त्यांच्यातील क्यूट संभाषणाचा व्हिडीओ त्याची आई सुमन चौधरी यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तुम्ही सोशल मीडियावर लहान मुलांसंबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधीकधी आपल्याला आश्चर्यचकीत करतात तर कधी खूप जास्त मनोरंजक असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. लहान मुलं ही निरागस असतात. त्यामुळे ते जे काही करतात ते सगळं अगदी कशाचाही विचार न करता सगळ्या गोष्टी करतात. ज्यामध्ये त्यांचं रागावणं आणि नाटकं देखील येतात. हा व्हिडीओ इंटरनेटचे लक्ष वेधून घेत आहे. लहान मुलीच्या गोंडसपणासोबतच पश्चातापाच्या सुंदर अभिव्यक्तीने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.

इंस्टाग्राम युजर सुमन चौधरीने तिच्या avira_ki_dunia हँडलवर व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “रुठे हुए जय भैया को मनानेकी प्यारी कोशिश.” व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी सतत तिच्या भावाची माफी मागत असते, ज्यासाठी ती सतत ‘भैय्या सॉरी’ म्हणते. पण, तिचा भाऊ मानायला तयार नसतो. हे पाहून लहान मुलीला आश्चर्य वाटले. वारंवार सॉरी सांगूनही भाऊ तिच्याशी बोलण्यासाठी तयार नसतो. मग काय या चिमुकलीलाही राग आवरत नाही, मग ती आपल्या भावाला रागा-रागाने हाक मारु लागते आणि त्याला मारण्यासाठीही सरसावते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम