‘जवान’ चित्रपटातील एका गाण्यासाठी कोटींचा खर्च !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  बॉलिवूडचा किंग म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खान दरवर्षी वेगवेगळ्या चित्रपटात आपली भूमिका बजाविताना दिसत असतो. आगामी ‘जवान’ सिनेमाच्या कामात व्यस्त असून पठाण नंतर याही सिनेमाकडून त्याला अपेक्षा आहेत. चाहतेही सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘जवान’ चा प्रिव्ह्यू व्हिडिओ काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला. आता मेकर्स सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज करणार आहेत. ‘जिंदा बंदा’ गाण्याचं नाव आहे आणि हे गाणं चेन्नईत शूट करण्यात आलं आहे. शाहरुखच्या ‘जवान’ सिनेमातील हे गाणं मोठ्या स्केलवर शूट करण्यात आलंय. पाच दिवसांच्या आत गाण्याचं शूट पूर्ण झालंय. विशेष म्हणजे गाण्यात चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, मधुराई आणि मुंबईसारख्या शहरातील हजार पेक्षा जास्त डान्सर्स दिसणार आहेत. केवळ गाण्याचं बजेटच १५ कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये शाहरुख १ हजार पेक्षा जास्त मुलींमध्ये डान्स करताना दिसणार आहे.

साऊथ सिनेदिग्दर्शक अॅटलीने जवान दिग्दर्शित केला आहे त्यामुळे सिनेमाची जास्त चर्चा आहे. सिनेमाची कास्टही तगडी आहे. साऊथस्टार विजय सेतुपती, साऊथची आघाडीची अभिनेत्री नयनतारा, प्रियामणि, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांचीही सिनेमात भूमिका आहे. दीपिकाचा सिनेमात स्पेशल अॅपिअरन्स असणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम