दै. बातमीदार । १५ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील राेटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या सांस्कृतिक समितीतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात डॉ. राजेश जैन, डॉ. अभय गुजराथी यांनी देशभक्तीपर गीते तर डॉ. राहुल मयुर, सुनील कानडे, तृप्ती पारेख यांनी कविता सादर केल्या. आद्विता सिंग व अपूर्वा दामले यांनी सोलो डान्स तर डॉ. वैशाली जैन, सीमा बलदवा, मीना लुणिया, रमा सिंग, प्राजक्ता वैद्य यांनी समूह नृत्य सादर केले. सूत्रसंचालन प्राजक्ता वैद्य यांनी तर आभार प्रा.डॉ. अपर्णा भट-कासार यांनी मानले.
यावेळी अध्यक्ष विपुल पारेख, माजी सचिव रविंद्र वाणी, सहसचिव दिनेश थोरात आदि मान्यवरांसह रोटरी जळगाव सेंट्रलचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य आणि कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम