ग्राहकांना बसला धक्का ; सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असल्याने अनेकानी सोन्यासह चांदीची खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते होती.
या वर्षी फेब्रुवारी-एप्रिल महिन्यात धातुंनी रेकॉर्ड ब्रेक केले होते. मध्यंतरी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु इस्त्राइल हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. मागील दोन दिवसात सोन्या- चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. मागच्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५६, ७५० रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ६१,९०० रुपये मोजावे लागणार आहे. १० ग्रॅमनुसार सोन्याचा भाव हा २१० रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या भावात किंचित वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम चांदीसाठी ७५३ रुपये मोजावे लागणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम