दादांचे सूचक ट्विटने भाजपच्या गोटात हालचालींना वेग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मे २०२३ ।  देशात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेस आसमान दाखविले आहे. या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. कानडी जनतेने भाजपला नाकारले आहे. देशभरात काँग्रेसचा जल्लोष सुरु असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळं भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे

कर्नाटकामधील निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल, अस सूचक विधान अजित पवार यांनी ट्विटमध्ये केलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम