
श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी ; पुण्यात गुन्हा दाखल !
दै. बातमीदार । २६ जानेवारी २०२३ । देशात सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आलेले बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण महाराज नुकतेच नागपूर येथील एका कार्यक्रमात येवून गेले यावेळी राजकीय सामाजिक नेत्यासह भक्तांनी त्यांची भेट घेत दर्शन घेतले यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेद्र महाराज यांना आव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली होती. तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्याम या प्रकरणी पुण्यातील हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्याम मानव यांच्या मुलाने तक्रार दिली. हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम मानव यांच्या विरोधात काही कट रचून त्यांना मारण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई हिंजवडी पोलीस करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते व श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकर्ते हरीश देशमुख यांनी दिली होती. तुमचा दाभोळकर करु, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. यापूर्वी देखील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे होता. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत त्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली होती. श्याम मानव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतात. त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम