उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी असे केले होते अमृतांना प्रपोज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ ।  राज्यातील राजकारणात नेहमीच भाजपचे नेते देवेद्र फडणवीस चर्चेत असतात तर त्यांच्या पत्नी देखील आपल्या वक्तव्य व गाण्याच्या माध्यमातून चर्चेत असतात. अनेक वेळा बॉलीवूड क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक नेते व अभिनेत्याची खाजगी आयुष्य जरा चर्चेचा विषय असतो, अशीच चर्चा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रेमाची सध्या राज्यभर सुरु आहे.

अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल1979 साली झाला. अमृता या नेहमीच त्यांच्या पतीच्या बाजूने ठामपणे उभे राहताना आपण पाहिल्या आहेत. तसेच, अनेकदा त्यांचे नेत्यांसोबत झालेले ट्वीटर वाॅरही यला मिळतात. अमृता फडणवीस या गायिका तसेच समाजसेविका आहेत. अशा अमृता फडणवीस यांचा आज 44 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फिल्मी स्टाईलने केलेल्या प्रपोजचा भन्नाट किस्सा जाणून घेऊया.

कधीही लग्न करायचे नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देव, देश आणि धर्मासाठी संपूर्ण जीवन वाहून घेण्याच्या विचारात ते होते. मात्र, एकेदिवशी देवेंद्र फडणवीस यांना अमृता रानडेंचं स्थळ आलं आणि फडणवीसांनी त्यांचा निर्णय बदलला. देवेंद्र फडणवीस यांनी अमृता यांना पहिल्याच भेटीत एक फिल्मी लाईन ऐकवली होती.

..अन् फडणवीसांनी लग्नाचा निर्णय घेतला

देवेंद्र फडणवीस यांच्या आई सईताई यांना देवेंद्र यांनी घेतलेला निर्णय मान्य नव्हता. फडणवीस जेव्हा दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांच्या आईने स्थळ शोधण्यास सुरुवात केली. लग्न करण्याबाबत आईच्या आग्रहामुळे त्यांनी दोन-चार फोटो पाहण्यासही होकार दिला होता. त्यावेळी फडणवीसांच्या आईच्या नजरेत डाॅक्टर चारुलता आणि शरद रानडे यांच्या कन्या अमृता आल्या होत्या. अमृता यांचा फोटो फडणवीसांनी पाहिला, त्यांचा नंबरही त्यांनी घेतला आणि गाठीभेटी वाढल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तुम्ही काजोलसारख्या दिसता
देवेंद्र फडणवीस जेव्हा अमृता यांना भेटले तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांनी तुम्ही काजोलसारख्या दिसता, काजोल माझी फेवरेट आहे , असे फिल्मी वाक्य म्हटले होते. कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला फडणवीस अमृता यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपला संसार थाटला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम