मुलाचे भविष्य करा सुरक्षित : ६ रुपये जमा करून मिळवा लाखो रुपये !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ ।  देशात मोठ्या प्रमाणात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशी परिस्थिती असतांना प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करीत असतो त्यामुळे त्या व्यक्तीसाठी हि बातमी महत्वाची आहे. उत्पन्नाची पर्वा न करता बचत करणे कठीण होऊन बसते. उत्पन्नानुसार खर्चही वाढत आहे. जर तुम्ही पालक असाल तर तुम्हाला आत्तापासूनच तुमच्या मुलाच्या भविष्याचा विचार करावा लागेल. आतापासूनच मुलांसाठी बचत करायला सुरुवात केली नाही, तर येणाऱ्या काळात शिक्षण आणि इतर खर्चाची व्यवस्था करणे कठीण होईल. अशा परिस्थितीत बालकांचे भविष्य सुधारण्यासाठी बाल जीवन विमा योजना ही एक चांगली योजना आहे.

बाल जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिस योजना आहे. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 6 रुपये गुंतवून तुमच्या मुलाचे भविष्य सुधारू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठी आगाऊ पैसे जमा करू शकता. चला तुम्हाला या विमा योजनेबद्दल सांगतो. पोस्ट ऑफिसने मुलांसाठी बाल जीवन विमा योजना आणली आहे. ही योजना फक्त मुलाचे पालकच खरेदी करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठीही काही अटी आहेत. उदाहरणार्थ, योजना घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 45 वर्षांवरील पालक या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.

5 ते 20 वर्षे वयोगटातील मुले या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या दोन मुलांसाठी पॉलिसी घेऊ शकतात. याचा अर्थ पालक त्यांच्या दोन मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतात, परंतु तिसऱ्या मुलासाठी नाही. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलासाठी दररोज 6 ते रुपये 18 पर्यंत प्रीमियम जमा करू शकता. 5 वर्षांसाठी या पॉलिसीमध्ये दररोज 6 रुपये प्रीमियम जमा करावा लागतो. या योजनेत 20 वर्षांसाठी 18 रुपये प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला एक लाख रुपये एकरकमी मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम