या अभिनेत्रीने केली गौतमीवर जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ ।  गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. त्यामुळे संपूर्ण राजभर एका या नावाची खूप चर्चा आहे. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.

सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. तर दुसरीकडे गौतमीवर टीकाही केली जाते तिचा कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणीही समाजातील काही लोकांकडून केली जाते, अशातच गौतमी पाटीलवर आता अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी टीका करत आपलं मत मांडलं आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’असे कार्यक्रमा साठी बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जो पर्यंत आहेत तोवर असे शो बंद होणार नाहीत, बघणाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्या शिवाय या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही.” प्रिया बर्डे पुढे म्हणाल्या,”लोक मोठाळ्या पैशांच्या सुपाऱ्या देऊन त्यांना आणतात. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. पण लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार” अशी भूमिका प्रिया बेर्डे यांनी मांडली आहे.

गौतमी पाटीलला पत्रकरांनी तिच्यावर टीका करणाऱ्या लोकांना काय प्रतिक्रिया देशील असा प्रश्न विचारण्यात आला यावर तिने तिने आपलं मत स्पष्टपणे मांडले होते. गौतमी पाटील म्हणाली,’मी स्वतःला लावणी नृत्यांगना म्हणून कधीही गवगवा केलेला नाही. माझ्या कार्यक्रमामध्ये अनेकांना अश्लीलता दिसते, ते मला त्यावरुन बोलतात, यासगळ्या प्रकारावर मी कित्येकदा माफीदेखील मागितली आहे. पण आता काहीजण ऐकत नसतील तर त्यांना मी काय म्हणू.’ असेही तिने सांगितले आहे. मला जे चांगले म्हणतात त्यांना धन्यवाद देते. जे नाही म्हणत त्यांना बाय बाय करते. लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महिला दिनाच्या निमित्ताने जो माझा गौरव केला जातो त्याबद्दल मी आभारी आहे. महिलांचे प्रेम मला मिळते आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. असेही ती म्हणाली आहे.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम