कश्मिराचा ‘विना मेकअप’ फोटो व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कश्मिरा ही तिच्या अभिनयासाठी नाही तर दिसण्यामुळे जास्त आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता मात्र ज्या लूकनं कश्मिरा चाहत्यांना घायाळ करत होती तोच लूक विनामेक अप व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन तिला वाट्टेल त्या कमेंटही केल्या आहेत.

यापूर्वी देखील वेगवेगळ्या कारणामुळे कश्मिरा चर्चेत आली होती. ती तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आतापर्यत बॉलीवूडच्या निवडक चित्रपटांमध्ये दिसलेली कश्मिरा ही फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखली जाते. तिचा नवा लूक व्हायरल झाल्यानंतर तिच्यावरुन नको त्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तिचा तो लूक पाहिल्यानंतर एखाद्या बॉलीवूड स्टार्ससाठी मेकअप किती महत्त्वाचा असतो दिसून येते. विना मेकअप त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ जर चाहत्यांनी पाहिले तर त्यावर त्यांची परखड प्रतिक्रिया ठरलेली असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम