धुळे : कंटेनर घुसला थेट हॉटेलमध्ये १३ जण जागीच ठार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात शिरला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. दुपारी बार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम