तरुणाने प्रसिद्धीसाठी केला जीवाशी खेळ ; थक्क करणारा व्हिडीओ !

बातमी शेअर करा...

सध्याची तरुणाई सोशल मिडीयावर इतकी सक्रीय असते कि त्याला कुठलीही मर्यादा नसतेच असेच काही उदाहरण नेहमी सोशल मिडीयावर दिसायला मिळत असते. त्यातील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अनेक गोष्टी करत आहेत. काही जण तर प्रसिद्धी झोतात येण्सासाठी आपला जीवदेखील धोक्यात घालत आहेत.

असे धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. एक व्यक्ती ट्रेनसमोर धोकादायक स्टंट करताना दिसून आला. सोशल मीडियावर लोक वेगवेगळे रील बनवून शेअर करत असतात. यामध्ये निरनिराळे व्हिडीओ पहायला मिळतात. नुकताच समोर आलेला व्हिडीओ धोकादायक आहे. व्यक्तीनं चक्क रेल्वे ट्र्रॅकवर झोपून व्हिडीओ बनवलाय. हा धोकादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

 

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहे. एक व्यक्ती पुलावर रील बनवत आहे. रेल्वे ट्रॅकवर पडून आपले दोन्ही हात डोक्याखाली ठेवले आणि त्यानंतरच ट्रेन तिथून भरधाव वेगाने जाताना दिसली. हा व्यक्ती जीव मुठीत ठेवून रील बनवत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. फक्त प्रसिद्धीसाठी रिल बनवून स्वतःचा जीव धोक्यात घालणं खूपच भयानक आहे.

@ajaychauhan41 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 11 सेकंदांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. लोक अशा कृतीवर संताप व्यक्त करत आहे. अनेकजण बोलत आहे की अशा लोकांवर कडक कारवाई व्हायरल पाहिजे. लोक अनेक कमेंट करत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे अद्याप समोर आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक रील बनवताना काहीही करतात. यामुळे स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला आपला त्रास होतोय याचं भानही अनेकांना नसतं. असे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत व्हायरल झाले आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम