पटेलांचा गोप्यस्फोट : तेव्हाच जाणार होतो भाजपसोबत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या असून या घडामोडींची सुरवात झाली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीने, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदार यांनी शिवसेनेतून बंड केलं आणि राज्यातून सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेत 2 गट पडले.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते यांनी पुन्हा समर्थक आमदार यांना घेऊन शिवसेना भाजप यांच्या युतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. तर रविवारी अजित पवार यांनी आपल्या 8 आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली. तर राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. याच दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी युती करावी, असे पत्र शरद पवार यांना दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केला आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले, पटेल यांनी TOI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 2022 च्या मध्यात भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम