आता टपाल कार्यालयात मिळणार डिजिटल पार्सल लॉकर सुविधा !
बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३
देशभरात आता डिजिटल पद्धत वापरण्यात येत असतांना आता टपाल कार्यालयात देखील डिजिटल पार्सल लॉकर सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात ब्लू डार्ट कुरिअर कंपनीने इंडिया पोस्टबरोबर करार केला आहे. या सहकार्यातून डिजिटल पार्सल लॉकर सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे नागरिक टपाल कार्यालयातील डिजिटल पार्सल लॉकरमधून आपले साहित्य गोळा करू शकतील. ही सेवा मिळवण्यासाठी कोणतीही पावती अथवा स्वाक्षरीची आवश्यकता भासणार नाही.
ब्लू डार्ट आणि इंडिया पोस्टने वर्धित सेवांसाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. याअंतर्गत ब्लू डार्टने काही निवडक पोस्ट ऑफिसमध्ये स्वयंचलित डिजिटल पार्सल लॉकर्स बसवले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वस्तू पाठवण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. लोक त्यांना देण्यात आलेल्या कोडच्या माध्यमातून लॉकर उघडू शकतील, असे ब्ल्यू डार्टने म्हटले आहे. हे पार्सल लॉकर ग्राहकांची सामग्री सुरक्षित ठेवतात आणि सहज उपलब्ध असतात. ग्राहक नियुक्त केलेला कोडचा वापर करून लॉकर उघडू शकतात. याव्यतिरिक्त, वितरण कधीही गोळा केले जाऊ शकते आणि केवळ अधिकृत कर्मचारी पॅकेजेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम