ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात काय आहे पेट्रोल-डीझेलचे दर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या काही महिन्यापासून पेट्रोलसह डीझेलच्या दरात चढ उतार पाहण्यात येत असतांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत. सकाळी 6 च्या सुमारास WTI क्रूड $ 91.72 प्रति बॅरलवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 92.40 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) , तसेच उपराजधानी नागपूर आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणखी इतर शहरात तेलाच्या किमती काय ठरल्या आहेत ते जाणून घेऊया.
मुंबई – पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
पुणे – पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
ठाणे – पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगर – पेट्रोल 107.02 रुपये आणि डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
नागपुर – पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम