दिग्दर्शक ए.आर.रेहमानने ठोकला मानहानीचा दावा !
बातमीदार | ५ ऑक्टोबर २०२३
देशभरात नेहमीच संगीत क्षेत्रात चर्चेत असलेले बॉलिवूडचे दिग्गज संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान हे आता जरा वेगळ्या चर्चेत आले आहे. त्यांनी एका संस्थेला मानहानीची नोटीस पाठवली आहे. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियावर ए आर रहमान यांनी १० कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. ए आर रहमान यांनी ही मागणी एका कायदेशीर नोटीसला उत्तर देताना केली आहे.
ASICON या संस्थेने ए आर रहमान यांच्यावर असा आरोप केला आहे की, २०१८ मध्ये संस्थेच्या ७८ व्या वार्षिक संम्मेलनात ए आर रहमान परफॉर्म करणार होते. या कार्यक्रमासाठी ए आर रेहमान यांना अॅडवान्समध्ये पैसे देण्यात आले होते. परंतु ते कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यामुळे ASICON यांनी कथिकपणे ए आर रहमान यांच्याकडे अॅडवान्स बुकिंगसाठी दिलेले पैसे परत दिले नसल्याचा आरोप करत २९.५ लाख रूपयांची मागणी केली.
४ पानांच्या उत्तरात ए आर रहमान यांच्या वकील नर्मदा संपत यांनी ASICON या संस्थेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ए आर रहमानच्या वकिलाने उत्तर देताना सांगितले की, त्यांनी कधीच या संस्थेसोबत करार केला नव्हता. परंतु ही संस्था प्रसिध्दीसाठी माझ्या नावाचा वापर करत असून माझे नाव बदनाम करत आहे. या कार्यक्रमाच्या अॅडवान्स बुकिंगसाठी मला पैसेच देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ए आर रहमान यांनी उत्तरात पुढे असे म्हटले आहे की, ‘मला असे पैसे कधीच दिले गेले नाहीत. उलट हे पैसे ‘सेंथिलवेलन अँड सेंथिलवेलन’ या थर्ड पार्टी कंपन्यांच्या समूहाला देण्यात आले होते. ASICON या संस्थेचा माझ्याशी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही आणि हे माहीत असूनही त्यांनी मला वादात अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फक्त संस्थेच्या प्रसिद्धीसाठी आणि मला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहेत.ए आर रहमान आणि त्यांच्या वकील नर्मदा संपत यांनी सर्जन्स असोसिएशनला जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे. तसेच १५ दिवसांत १० कोटी रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम