राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ; कुणाची लागणार वर्णी ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांचा प्रवेश झाल्यानंतर सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अनेक आमदार मंत्रीपदाची स्वप्न पाहत होती मात्र अचानक अजित पवारांनी सरकारमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे स्वप्न नाहीसे झाले पण आता याच आमदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली वाढल्या असून गणेशोत्सवापूर्वी विस्तार होईल, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात १४ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असून नेमकी कुणाची वर्णी लागणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

सध्या भाजप हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ७ जागा दिल्या जाणार आहे. तर उर्वरित मंत्रिपदावर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. यावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबईतील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. अगदी दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. याशिवाय पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजपमधील १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा शिंदे गटातील अनेक आमदारांना होती. मात्र, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने त्यांची ही आशा काही दिवसांसाठी लांबणीवर पडली. अजित पवार सत्तेत सहभागी होताच त्यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिक स्पर्धा आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे, भरत गोगावलेंनी फक्त मंत्रिपदच नाही, तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा केलाय. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार हेच पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होताच शिंदे गटात आनंदाची लाट आली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदारांनी तर आपल्या मंत्रीपदाबाबतची इच्छा जगजाहीर केली होती, अपक्ष आमदार बच्चू कडू देखील मंत्रिपदावर दावा करत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम