टीम इंडियासाठी ‘करा किंवा मरा’ ; आज खेळली जाणार लढत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | देशात अनेक क्रिकेटचे प्रेमी असता यांच्यासाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. विंडीजविरुद्ध सलग तिसरा पराभव आणि पाच सामन्यांची मालिका गमविण्याची नामुष्की टाळायची झाल्यास टीम इंडियाला मंगळवारी येथे खेळल्या जाणाऱ्या ‘करा किंवा मरा’ अशा तिसऱ्या टी-२० लढतीत निर्धास्त होऊन खेळावे लागणार आहे.

येथील संथ खेळपट्टी भारतीय फलंदाजांची डोेकेदुखी वाढवीत आहे. त्यामुळे विजयासाठी अतिरिक्त १०-२० धावा काढण्यात दिग्गज फलंदाज सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरले. विंडीजने २०१६ ला भारताला टी-२० मालिकेत पराभूत केले होते. सध्या ०-२ ने माघारलेल्या भारताचा आणखी एक पराभव मालिका गमाविण्याचे कारण ठरू शकतो. त्यामुळेच पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याची आक्रमकता अवलंबावी लागेल. ईशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव हे सुरुवातीला अपयशी ठरल्याने संजू सॅमसन, तिलक वर्मा यांच्यावर मधल्या फळीत दडपण आले. वर्माने मात्र हे दडपण झुगारून धावा काढल्या. आशिया चषकाआधी फलंदाजांना धावा काढाव्या लागतील, असे कर्णधार हार्दिकने पराभवानंतर म्हटले होते. फलंदाजी क्रम सहाव्या स्थानापर्यंत असल्याने अक्षर पटेलला पुन्हा संधी मिळू शकते. फॉर्ममध्ये असलेला कुलदीप यादव अंगठ्याला सूज आल्याने रविवारी खेळला नव्हता. तो तिसरा सामना खेळेल का, हे पाहावे लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम