शाहरुख आला पुन्हा चर्चेत ; स्मोकिंग प्रकरण केली दिलखुलास चर्चा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही वर्षापासून अभिनेता शाहरूख खान नेहमीच वेगवेळ्या कारणाने चर्चेत येत असतो. गेल्या काही वर्षापूर्वी शाहरूखनं मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात लाच दिल्याचा आरोप करण्यात येतोय तर दुसरीकडे अभिनेता सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारतोय. शाहरूख आणि त्याचं आस्क एसआरके सेशनची चांगलीच चर्चा होते. नुकतंच त्यानं आस्क एसआरके सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला भन्नाट प्रश्न विचारले. यानिमित्तानं शाहरूखचं स्मोकिंग प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

अनेक वर्षांनी शाहरूखनं त्याच्या सिगरेट पिण्याच्या सवयीबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. शाहरूखचं उत्तर ऐकून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.शाहरूख खान हा बॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. आज त्यानं त्याच्या अभिनयानं कोटी रुपयांचा डोलारा उभा केला आहे. यशाच्या शिखरावर असणाऱ्या शाहरूखला मात्र आजवर त्याची सिगरेट पिण्याची सवय काही सोडता आली नाही.

मी दिवसाला 100 सिगरेट पितो असा खुलासा स्वत: शाहरूखने मागे एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा शाहरूखच्या सिगरेट व्यसनाविषयी चाहत्यांनी प्रश्न केला आहे.हेही जेव्हा धर्मेंद्र यांनी सनी देओलनंतर या अभिनेत्याला सर्वांसमोर म्हटलं होतं मुलगाशाहरूखनं ट्विटरवर आस्क एसआरके सेशन घेतलं. या सेशन चाहत्यांचा नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. एका चाहत्यानं शाहरूखला ‘तू सिगरेट पिणं सोडलं का ?’ असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाचं त्वरित उत्तर देत शाहरूखनं म्हटलं, ‘होय मी खोटं बोललो, कॅन्सर स्टिकच्या धुरानं मला वेढलं आहे.’ शाहरूखच्या या उत्तरानं सगळ्यांच भुवया उंचावल्या आहेत. इतक्या वर्षात शाहरूख त्याची सिगरेट पिण्याची सवय सोडू शकला नसल्याचं सर्वांना आश्चर्य वाटलंय.2011मध्ये शाहरूखनं दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या सिगरेट पिण्याच्या सवयीवर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की, “मला झोप येत नाही. मी जवळपास एका दिवसात 100 सिगरेट पितो. या सगळ्यात मी जेवणं विसरून जातो. इतकंच काय तर मी पाणी देखील प्यायचं विसरतो. दिवसाला 30 कप ब्लॅक कॉफी पितो. तरीही माझे सिक्स पॅक्स आहेत. मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो, तितकी माझी आपोआप काळजी घेतली जाते असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही”.शाहरूखच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर शाहरूखचा पठाण हा सिनेमा वर्षाच्या सुरूवातीलाच ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर शाहरूख जवान या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम