वैवाहिक जीवनात नेहमी आनंदी राहण्यासाठी हे उपाय करा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ आपल्या घरातील कोणती वस्तू आपल्या नेहमी काही तरी देत असते कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक उर्जा देवून ज्याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या प्रगतीवर, आर्थिक स्थितीवर तसेच वैवाहिक जीवनावर होतो. कधीकधी या वास्तू दोषांमुळे वैवाहिक जीवनात इतका प्रभाव पडतो की, नाते तुटण्याचीही वेळ येते. प्रत्येकाची इच्छा आनंदी राहण्याची असते, वास्तुशास्त्रानुसार यासाठी घरात थोडासा बदल करणे आवश्यक आहे. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते बदल करावेत, जेणेकरून वैवाहिक जीवनात सुख कायम राहील.

वास्तुशास्त्रातील दिशानिर्देशांच्या आधारे वातावरणातील नकारात्मक उर्जेचा प्रभाव दूर करून, सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढविण्याविषयी काही उपाय सांगितले आहे, त्याचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तसेच वास्तुसंबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तुमच्या वैवाहिक जीवनातही काही समस्या असतील तर वास्तुशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते पूर्वीसारखे सुंदर बनवू शकता. यासाठी वास्तुशास्त्राशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

बेडरूममध्ये हा रंग लावा
सुखी वैवाहिक जीवनासाठी, जोडीदारांमध्ये विचारांची स्पष्टता असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे विचारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी उत्तर-पूर्व दिशेला निळा किंवा जांभळा रंग वापरावा.

बेडरूम या दिशेला असावी
हे लक्षात ठेवा की, तुमची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला आहे. या दिशेला बेडरूम राहिल्याने वैवाहिक जीवनावर चांगला परिणाम होतो.

बेडरूमचा आकार
शयनकक्ष निवडताना लक्षात ठेवा की, तो चौरस किंवा आयताकृती असावा.

‘या’ धातूचा बेड वापरू नका
वास्तुशास्त्रानुसार लक्षात ठेवा की, लोखंडी पलंगाचा वापर करू नये. यामुळे झोपेचा त्रास होतो. यासोबतच वैवाहिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

बेडरूममध्ये अशा प्रकारे आरसे लावू नका

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा लावताना या गोष्टीकडे लक्ष राहू द्या, की झोपताना त्यामध्ये तुमची आकृती दिसू नये. त्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात.

टीव्ही आणि संगणक
आजच्या काळात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. पण वास्तूनुसार ते खोलीच्या आत ठेवू नयेत. जर ते तुमच्या खोलीत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कपड्याने झाकून ठेवा.

या दिशेने फोटो लावा
वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवण्यासोबतच कुटुंबाचे फोटो नैऋत्य दिशेला लावा. यासोबतच तुमचा फोटो पश्चिम दिशेला लावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम