नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन चारचाकीचा अपघात ४ जागीच ठार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ नगर औरंगाबाद महामार्गावर दोन चारचाकीचा अपघात इतका भीषण होता कि ४ व्यावसायिक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गाजवळ कायगाव इथं कारचा अपघात झाला. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतांपैकी चौघेही व्यावसायिक आहेत, अशी माहिती हाती येत आहे.

MH 20 CS 5982 ही कार अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने चालली होती. त्यावेळी चालकाला कायगाव इथल्या वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार दुभाजकावर आदळली आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला धडकली. यात चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोचल्यावर त्यांनी अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढलं आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोवर उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रावसाहेब मोटे, सुधीर पाटील, रतन बेडवाल आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हे चौघे मित्र होते. ते प्लॉटिंगच्या व्यवसाय करत होते. तर ज्या कारला यांच्या कारची धडक बसली, त्यातले पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम