बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | प्रत्येक व्यक्ती शनिवार-रविवार असल्याने सगळ्यांना आठवड्याच्या सुट्टीचे वेध लागतात. या दोन दिवसांमध्ये घरातील कुटुंबीय विविध प्लॅन आखतात. या प्लॅनमध्ये जेवणाच्या मेन्यूपासून ते फिरायला जाण्याच्या बेतापर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाला जेवणात किंवा नाश्त्यामध्ये नवीन आणि वेगळा पदार्थ हवा असतो. त्यामुळे मग अनेकांच्या घरी मिसळपाव, बटाटे वडे, इडली चटणी, पावभाजी असे पदार्थ होतात. यात अनेकदा इडली करतांना पीठ व्यवस्थित भिजत नाही. त्यामुळे मग ही इडली खाण्यासाठी घरातले टाळाटाळ करतात. परंतु, अशी मऊ, लुसलुशीत इडली करण्यासाठी काही सोप्या टीप्स आणि ट्रिक्स आहेत.
1. इडल्या फुगून येण्यासाठी इडली बॅटर तयार करताना त्यात एक वाटी शिजवलेला भात घालावा म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुलून येतात.
2. इडल्या नीट फुगून न येता कडक किंवा दडदडीत, जाड होत असतील तर इडली बॅटर तयार करताना त्यात एक वाटी भिजवलेले पोहे घालावेत. या भिजवलेल्या पोह्यांमुळे इडल्या फुगून येण्यास मदत होते.
3. इडल्या फुगून येण्यासाठी त्यात एक टेबलस्पून इनो घालून त्यावर जरासा लिंबाचा रस मिसळून इडली बॅटर परत ढवळून घ्यावे. यामुळे इडल्या फुगून येतात.
4. इडली चविष्ट आणि स्पाँजी होण्यासाठी पॉलिश न केलेली उडीद डाळ वापरा. आणि इडली काळी होऊ नये म्हणून डाळ अगोदर स्वच्छ 3 वेळा धुवून घ्या.
5. इडली कधीही वाफवतांना १० ते १५ मिनिटांच्या वर ठेवू नये. जास्त वेळ वाफ दिल्यास ती कडक होऊ शकते.
6. इडली पात्रामध्ये ठेवण्यापूर्वी इडली पात्रात पाणी टाकून ते छान गरम करुन घ्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम