
तब्बल पाच वेळा शस्त्रक्रिया होऊनही रुग्णाचा त्रास कमी होईना अखेर डॉ.अनिल शिंदेनी केली यशस्वी शास्रक्रिया,रुग्ण झाला पिडामुक्त
अमळनेर(प्रतिनिधी )-व्याधी कोणतीही असो त्यावर केवळ शस्त्रक्रिया करणे महत्वाचे नसून ती शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून विशेष कौशल्य वापरून यशस्वी झाली पाहिजे तरच तो रुग्ण पिडामुक्त होऊ शकतो याचा प्रत्यय नुकताच डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन मध्ये हर्नियाची सहाव्यांदा यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला आला आहे.
सदर हार्निया झालेल्या 60 वर्षीय रुग्णावर यापूर्वी इतर ठिकाणी पाच वेळा शस्त्रक्रिया होऊनही त्याची पीडा कमी होत नव्हती यामुळे प्रचंड भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती, दिलीप बाळू पाटील (वय 60) वर्ष रा.जळगाव असे या पीडित रुग्णाचे नाव असून गेल्या काही दिवसापासून ते या हर्नियाच्या आजाराने प्रचंड त्रासले होते .त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्याने औषध उपचार घेतले मात्र त्यांच्यावर काहीएक फरक पडत नव्हता.सुरवातीला उपचार सुरु असलेल्या जळगाव येथील डॉक्टरांनी या रुग्णावर हार्नियाची शस्त्रक्रिया केली मात्र तरी देखील मात्र फरक पडत नसल्याने त्यांनी जळगाव येथील दुसऱ्या डॉक्टर कडे शस्त्रक्रिया केली.मात्र ती पण अयशस्वी झाली.त्यानंतर त्यांनी जळगाव तील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर तिसऱ्या वेळेस शस्त्रक्रिया करण्यात आली.मात्र तरी देखील पीडा काही कमी झालीच नाही,म्हणजे एकाच दुखण्यावर तीन डॉक्टरांनी त्यांच्यावर पाच वेळेस हार्निया ची शस्त्रक्रिया केली होती,तरीही फरक काही पडला नसल्याने रुग्णाने बरे होण्याची आशाच सोडली होती अखेर नातलगांच्या सांगण्यावरून त्यांनी अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फौंउडेशन मध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली.प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ अनिल शिंदे यांनी त्यांची सपूर्ण माहिती जाणून घेवून घेत पुन्हा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला,रुग्णही तयार झाल्याने सायकाळी सात वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत सुमारे पाच तास ही शस्त्रक्रिया चालली.यासाठी भुलतज्ञ डॉ महेश पाटील व स्टाफ चे सहकार्य लाभले,अखेर पाच वेळा अयशस्वी झालेली शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेचे जादूगार डॉ शिंदे यांनी यशस्वी करुन रुग्णास कायमचे पिडामुक्त केल्याने डॉक्टरांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
डॉक्टरांचे माझ्यावर हे ऋण,,
जावयाने डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आग्रह धरला होता.मात्र पाच वेळा शस्त्रक्रिया होऊनही आजार बरा होत नसल्याने मी हिम्मत हारलो होतो.मात्र डॉ.अनिल शिंदे यांनी अथक परिश्रम घेवून माझी शस्त्रक्रिया यशस्वी केली.त्यांचे हे ऋण मी कधीच विसरणार नाही.
दिलीप बाळू पाटील,रा.जळगाव रुग्ण
चुका होतात, पण तज्ञ डॉक्टरांना जरूर भेटा ,,,
रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करताना अनावधानाने चुका होत असतात अश्या वेळी घरात बसून न राहता त्या त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांना दाखविल्यास निश्चितपणे आजारातून व दुखण्यातून मुक्ती मिळू शकते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम