विष्णू मनोहर पुन्हा करणार रेकॉर्ड ब्रेक : २ हजार किलोचा बनविणार महाचिवडा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ ।  सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे नेहमीच या ना त्या रेकॉर्डने चर्चेत राहत असतात, दर वर्षी एक नवा रेकॉर्ड ते बनवीत असतात, त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या रविवारी १६ रोजी नागपूर येथील रामदासपेठ येथील विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी 9 ते 11 या वेळेत दोन हजार किलो महाचिवडा तयार करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच 2500 किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण केले होते. चिवड्याचा मनोहर यांचा 14 वा विश्व विक्रम राहाणार आहे. सलग 53 तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. 5 फूट लांब आणि 5 फूट रुंद असा “सर्वात लांब पराठा’ तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात 7000 किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी भारतात 3200 किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी 3000 किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर 5000 किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

दिवाळी म्हटली की लाडू, चकल्या आणि शेव चिवड्याशिवाय होत नाही. त्यातही चिवडा आवडता असतो. चिवडा केवळ दिवाळीतच नाही. तर वर्षभर घरोघरी होतो. म्हणून दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले.

या चिवड्यासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून 600 किलो चिवडी आणली. या चिवड्यात बदाम, काजूही असणार आहे. या चिवड्यासाठी लागणारे जिन्नस असे : (सर्व किलोमध्ये) शेंगदाणा तेल ३५० किलो, शेेंगदाणे 100 किलो, काजू व किसमीस 100, डाळवा व खोबरे प्रत्येकी 50, हिंग व जीरे पावडर प्रत्येकी 15 किलो, मिर्ची पावडर 40, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी 100, वाळलेले कांदे 50 किलो, धने पावडर 40 किलो लागणार आहे. या सर्व साहित्याची खरेदी सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम