
DRI ने जप्त केले 15 कोटी रुपयांचे ड्रग्ज ; तिघांना अटक
दै. बातमीदार । २४ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये एक पार्सल रोखले महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने मुंबईत 1.9 किलो एम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे DRI चा दावा आहे. या प्रकरणी नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या पथकाने गुरुवारी, 20 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये एक पार्सल रोखले होते. हे पार्सल पॅरिसहून पाठवण्यात आले असून ते मुंबईच्या बाहेरील नालासोपारा येथील पत्त्यावर पोहोचणार होते. या पार्सलमधून 1.9 किलो अॅम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ (ATS) गोळ्या जप्त करण्यात आल्या, ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 15 कोटींहून अधिक आहे. वृत्त संस्थेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. पार्सल नेमके कोणकडे पोहोचणार होते, याचा तपास करण्यासाठी तपास संस्थेने नियोजित मोहीम राबवली आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या माध्यमातून हे पार्सल पोहोचवले जात होते. डीआरआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत नायजेरियन नागरिकासह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम