न्यासा देवगण दिसली दिवाळी पार्टीत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी पार्टीत अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण नजरेस पडली, पण त्यात तिला ओळखताच येईना असं अनेकांचे मत पडले. न्यासा देवगणला भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीत स्पॉट केलं गेलं,ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या तर न्यासा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे भलतीच चर्चेत आहे. पण या दिवाळी पार्टीतील फोटो पाहून नेटिझन्स न्यासाला जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत. सर्वचजणं अंदाज लावत आहेत की तिनं चेहऱ्याची सर्जरी केली असावी.

बॉलीवूडमध्ये सध्या मोठ्या धामधुमीत दिवाळी साजरी करताना सगळेच स्टार दिसत आहेत. स्टार्स सोबतच निर्माते देखील दिवाळी पार्टीचं आयोजन करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वीच मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं,तेव्हा अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर,२०२२ रोजी बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये बॉलीवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते, ज्यात अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण देखील सामिल झाली होती.

भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीत न्यासाला गोल्डन कलरच्या लेहेंग्यात स्पॉट केलं गेलं होतं,ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या दिवाळी पार्टीतले न्यासाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत,ज्यात न्यासा कारमध्ये बसली होती आणि आपल्या फ्रेंड्स सर्कलसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. बातमीत तो व्हिडीओ जोडलेला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम