दिवाळीला वाहनचालकांच्या खिशाला फटका बसणार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

देशभरात दिवाळी सणाचा उत्सव धूमधडाक्यात सुरु असतांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात या किमतीत सातत्याने घसरण होत होती. आज किमतीत थोडी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला वाहनचालकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूज ऑईलच्या किमतीत 0.16 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रति बॅरल 80.14 डॉलर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.03 टक्क्यांनी वाढ झाली असून ऑइल प्रति बॅरल 75.76 डॉलरने विकले जात आहे. कच्च्या तेलाच्या भावात जरी वाढ झाली असले तरी पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा फरक पडलेला नाही.

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव
पुणे
पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
ठाणे
पेट्रोल रुपये 105.74 आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगर
पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल 106.28 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
नागपूर
पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम