महामार्गावर अपघाताचा थरार : तीन ठार तर ६ गंभीर जखमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

राज्यात भीषण अपघाताची घटना मुंबई येथील वांद्रे परिसरात घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांद्रे वरळी सी लिंकच्या 100 मीटर आधी हा अपघात झाला. जेथे भरधाव वेगात असलेल्या कारने तेथे उभ्या असलेल्या 6 वाहनांना धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10.15 च्या सुमारास वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव इनोव्हा कार जात होती. सी लिंकवरील टोल प्लाझासमोर 100 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या इतर वाहनांना ओव्हरस्पीड कारची धडक बसली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. वेगात येणाऱ्या कारच्या चालकाने सी लिंकवर दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यानंतर त्याने पकडले जाऊ नये म्हणून गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात आरोपी कार चालकालाही दुखापत झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्याची कार जप्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम