इंडिगोच्या अडचणीत वाढ : ४० विमानांचे उड्डाण होणार बंद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेतील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंडिगोची ४० विमाने पुढील तिमाहीपासून उड्डाण करू शकणार नाहीत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इंजिन सप्लायर प्रॅट अँड व्हिटनीकडून इंजिन पावडर मेटलच्या समस्येमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीत इंडिगोच्या ४० विमानांचे कामकाज थांबवले जाणार आहे. प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिनमधील समस्येमुळे इंडिगोची सुमारे ३५ ते ४० विमाने आधीच ग्राऊंड झाली आहेत. गो फर्स्टला नेमकी हीच समस्या भेडसावत आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत इंडिगोकडे ३३४ विमानांचा ताफा होता. इंडिगोची आणखी विमाने ग्राऊंड झाली तर कंपनी आणि प्रवाशांच्या अडचणी वाढतील. प्रवाशांना महागड्या प्रवासाला सामोरे जावे लागू शकते. प्रॅट अँड व्हिटनी इंजिनमध्ये काही काळापासून समस्या येत आहेत. हे इंजिन फक्त इंडिगोमध्ये बसवली आहेत. ही समस्या लक्षात घेऊन डीजीसीएने त्यांचा वापर करणाऱ्या विमान कंपन्यांना इंजिनांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा नवीन वर्ष २०२४ च्या सुरुवातीपासून हवाई प्रवासावर बंदी घालण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इंडिगोचा निव्वळ नफा सुमारे १८८ कोटी रुपये होता. वाढती रहदारी आणि क्षमता वाढीमुळे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी सलग चार तिमाहीत फायदेशीर ठरली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इंडिगोचे एकूण उत्पन्न २०.६ टक्क्यांनी वाढून १५,५०२.९ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते १२,८५२.३ कोटी रुपये होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम