अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा साथीदार अटकेत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३

अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ललित याचा नाशिकमधील मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना तसेच अमली पदार्थ विक्रीची जबाबदारी या आरोपीकडे सोपवण्यात आली होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन ऊर्फ गोलू अहमद अन्सारी (३४, रा. ठाणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अन्सारी सहआरोपी आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्सारीचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला. नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत ललित आणि त्याचा भाऊ भूषण यांनी मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. आरोपी अन्सारी अमली पदार्थ विक्रीतून मिळणारे पैसे ललित आणि भूषणकडे देत होता. नाशिकमधील मेफेड्रोन निर्मितीच्या कारखान्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि अभियंता अरविंदकुमार लोहारे यांना चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ललितविरुद्ध मेफेड्रोन बाळगणे, तसेच रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे..

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम