
गर्भावस्थेत असता ‘या’ कारणाने होवू शकते प्रसूती वेळे आधी !
दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंग म्हणजे तिची एखाद्या बाळाला जन्म देणे, यावेळत महिला भरपूर प्रमाणात वैद्यकीय सल्ले घेत आपले ते दिवस उत्तम जाण्यासाठी पुरेपूर प्रयत्न्न करीत असतात, गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची स्थिती आहे. गर्भधारणेच्या या टप्प्यात होणारे बाळ कसे असेल, मुलगा की मुलगी याची तिला काहीही कल्पना नसते.
पण, तरीही ती त्याचे हट्ट म्हणजे डोहाळे पुरवते. एका सुदृढ आणि निरोगी बाळाला जन्म देणे हे जणू एका मातेचे ध्येयच असते. पण, गर्भावस्थेत योग्य ती काळजी न घेतल्याने प्रसुतीमध्ये अडचणी येतात. गर्भधारणा हा एक नऊ महिन्याचा प्रवास आहे. जिथे आईने तिच्या जीवनशैलीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत महिलांना अधिक जपावे लागते. गर्भधारणेदरम्यान तुम्हाला सकस आहार घ्यावा लागतो. गरोदर मातांनी या काळात आपल्या आहाराची अतिरिक्त काळजी घ्यावी. कारण त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
या दरम्यान, गर्भवती महिलांनी शरीरातील हायड्रेशन पातळी व्यवस्थित राखण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. कारण ते प्लेसेंटामध्ये अम्नीओटिक पदार्थ तयार करण्यास मदत करते. गरोदर मातांना दररोज 8-12 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. काही माता ग्रीन टी पितात. याचा बाळाच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो हे पाहुयात.
ग्रीन टीमध्ये कॅफेनचे घटक असतात. त्यामुळे बाळाशी जोडलेल्या नाळेतून रक्तप्रवाहाला हानी पोहोचू शकते. यामुळे बाळाच्या डीएनए पेशींना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे गर्भपातही होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान कॉफीच्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.कॉफीमध्ये असलेले कॅफीन बाळाच्या अवयवांचा योग्य विकास होऊ देत नाही. ज्यामुळे तूमची प्रसुती वेळेआधी होऊ शकते. जन्मलेल्या बाळाचे शरीर पूर्ण विकसित नसल्याने त्यांचा मृत्यू होईल किंवा ते दिव्यांग जन्माला येईल. ग्रीन टीचा गुणधर्म उत्तेजित आहे. याचे जास्त सेवन केल्याने तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात. ज्याच्या बाळावर परिणाम होतो. ग्रीनटी वजन कमी करण्यास मदत करते त्यामूळे प्रसूतीवेळी बाळाचे वजन कमी होईल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम