सोनिया सोबत राहू शकत नाही शोएबची ‘ती’पोस्ट व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२  बॉलीवूडमधील अभिनेत्यामधील लाइफ हि खूप वर्ष टिकणारी काही क्वचित लोकांची असते असेच एक वादळ सानिया मिर्जाच्या आयुष्यात आले असल्याची चर्चा सोशल मिडीयावार रंगली आहे.शोएब मलिक आणि सानिया मिर्जा यांच्यात काही ठीक सुरु नसल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर उधाण आलं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून विभक्त राहत असल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वाहिनीने दिली होती. दरम्यान, आता त्यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शोएब मलिकची एक जुनी पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

हे दोघे 30 ऑक्टोबर रोजी मुलगा इझानच्या वाढदिवशी शेवटचे एकत्र दिसले होते, पण त्यानंतर शोएब मलिकने सोशल मीडियावर जे काही लिहिले त्यावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर सानिया मिर्झाच्या पोस्टने त्याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आमच्यासाठी जीवनाला एक विशेष अर्थ होता. आपण एकत्र राहू शकत नाही, रोज भेटू शकत नाही, पण बाबा प्रत्येक क्षणी तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करतो. बाबा आणि मम्मी तुझ्यावर प्रेम करतात. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, सानियाने केलेल्या पोस्टने शोएबच्या या जुन्या पोस्टला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. तिनं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करत ‘ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, यासगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल.’ असे सानियानं म्हटले आहे.

 

दिवसांपासून केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून शोएब मलिकसोबतचा तिचा 12 वर्षाचा संसार मोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 12 एप्रिल 2010 मध्ये या दोघांनी हैदराबाद येथे लग्न केले होते. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नावेळी देखील एक मोठा वाद झाला होता. त्यावेळी सानिया मिर्झा ही शोएबची पहिली पत्नी नसल्याचे उजेडात आले होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम