
पंतप्रधान मोदी यांनी दिल्या पलक व मिथुनला शुभेच्छा ! म्हणाले…
दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२ तुळशी विवाह नंतर जर सोशल मिडीयावर चर्चा असले ती तर बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार मिथुन शर्मा आणि पार्श्वगायिका पलक मुच्छल नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास पत्र पाठवत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र पलकने सोशल मीडियावर शेअर केले आहे. जोडप्याला आशीर्वाद देत पंतप्रधानांनी लिहिलं आहे,”पलक आणि मिथुन नवीन प्रवासासाठी शुभेच्छा. दोघांचं एकमेकांवरचं प्रेम आणि आपुलकी दिवसेंदिवस वाढत जावो. कायम एकत्र राहत एकमेकांची स्वप्न साकार करण्यासाठी एकमेकांना मदत करा. आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात करताना माझा आशीर्वाद आहेच. लग्नसोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम