Women Train Travel : एकट्याने रेल्‍वेप्रवास करणाऱ्या महिलांना ‘मेरी सहेली’ ने दिले बळ

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२४ । एकट्या महिलेला रेल्वेतून लांबचा प्रवास करताना असुरक्षिततेची भावना असते. गर्दीचा फायदा घेऊन विनयभंग करणे, पर्स, दागिणे चोरी होणे अशा घटना आपल्या सामोरे येत असतात. अश्यातच एकट्या प्रवास करणाऱ्यांच्या मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)मधील महिला पोलिसांचे ‘मेरी सहेली’खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेगाड्यांमध्ये वर्षभरात दीड लाख महिलांना मदत केली आहे.

आचारसंहिता काळात पिंपरी-चिंचवड ग्रामीण भागात १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वेमध्ये गर्दी असणे ही बाब नेहमीचीच. अनेक महिला कधी एकट्या किंवा आपल्या बाळाला सोबत घेऊन प्रवास करतात. एकटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये तरुणींची संख्याही मोठी आहे. गर्दीचा फायदा घेऊन रेल्वेत प्रवास करणाऱ्या असामाजिक तत्त्वांकडून महिलांची छेडछाड, झोपेत असताना मोबाईल, पर्स, गळ्यातील दागिणे चोरणे अशा घटना नेहमीच घडतात.

अशा तक्रारींची गंभीर दखल आरपीएफने घेतली आहे. महिला आरपीएफची ‘मेरी सहेली’ ही विशेष टीम तयार करून प्रवासी महिलांवर सदर टीम नजर ठेवते. देशभरात २३० पेक्षा जास्त टीम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आल्या आहेत.

मेरी सहेलीमुळे महिलांना मदत मिळत असल्याने त्यांच्यात सुरक्षित प्रवासाची भावना वाढीस लागली आहे. महिलांकडून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, स्थानकावर याबाबत जनजागृती सुद्धा केली जात आहे.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने ‘मेरी सहेली’चे १३ पथक तयार केले आहे. महिला पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलचा सुद्धा यात सहभाग आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरात १९ हजार ७९४ रेल्वेगाड्यांमधून एकट्या प्रवास करणाऱ्या दीड लाख महिलांना ‘मेरी सहेली’ने मदत केली आहे.

यामध्ये नागपूर विभागातून धावणाऱ्या ४ हजार ८०९ गाड्यांमधून १३ हजार २९८ महिलांना मदत मिळाली. तर बिलासपूर आणि रायपूर विभाग मिळून १ लाख ३८ हजार ७०१ महिलांना मदत मिळाली आहे.

तुमच्याकडे येण्याचा प्रश्‍नच नाही, पण तुम्हाला सत्तेतून खाली उतरवू, पवार यांचे मोदींना थेट आव्हान

रेल्वे स्थानकावर ‘मेरी सहेली’ची टीम तपासणी करते. गाड्यांमध्ये एकट्या महिलांची चौकशी करून समस्यांबाबत विचारपूस करीत असते. याला प्रवासी महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तक्रारीही पुढे येऊ लागल्या असून महिलांना त्वरित मदत मिळत आहे.

– दीपचंद आर्य, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम