पंधरा दिवसांत डांबरीकरण करा अन्यथा आंदोलन करु, ‘स्वाभिमानी’चा इशारा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । बुलढाणा शहरातील बस स्थानकाजवळील मुख्य चौक संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जांभरून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यावर ५० पेक्षा जास्त महत्वाचे खाजगी दवाखाने आहेत. मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात रुग्णाची ये-जा या रस्ताने होत असते. या रस्त्यावर महिलांचे रुगालयही मोठ्या प्रमाणत आहेत, त्यामुळे गरोदर महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

असा हा अतिमहत्वाचा रस्ता खराब झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. तसेच या रस्तावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पण न.पा. प्रशासनाला काही जाग येत नसल्यामुळे संगम चौक ते जांभरून या रस्त्याचे १५ दिवसांच्या आत डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ‘स्वाभिमानी’चे शेख रफिक शेख करीम व अमोल मोरे यांनी न.पा.मुख्याधिकारी गणेश पांडे यांची भेट घेवून निवेदनातून केली आहे.

जर न.पा.प्रशासनाने १५ दिवसाच्या आत या रस्ताचे काम पूर्ण केले नाही तर नगर पालिकेच्या कार्यालयावर गाढवाच्या गळ्यात बोर्ड बांधून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी’चे शेख रफिक शेख करीम व अमोल मोरे यांनी दिला आहे. यावेळी ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम