दहशतवाद्यांशी चकमक : कर्नलसह 3 जवान शहीद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३  | श्रीनगरमधील अनंतनाग जिल्ह्यातील गरोल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कर्नलसह तिघे जण, तर राजौरी येथील चकमकीत एक जवान शहीद झाल्याची घटना बुधवारी घडली. मृतांमध्ये एक कमांडिंग अधिकारी, एक मेजर, एक पोलिस उपअधीक्षक यांचा समावेश असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. राजौरीतील चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला.

मंगळवारी संध्याकाळी कारवाई सुरु झाली; पण रात्री ती थांबवण्यात आली. बुधवारी सकाळी, दहशतवाद्यांचा शोध पुन्हा सुरु झाला. कर्नल सिंग टीमचे नेतृत्व करत होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मेजर आशिष आणि डीएसपी भट यांनाही गोळ्या लागल्या. बुधवारी झालेल्या चकमकीत दुसरा दहशतवादी ठार झाला. राजौरी जिल्ह्यातील दुर्गम गावात सुरु असलेल्या तीन दिवसांच्या शोध मोहिमेदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवारी पहाटे गरोल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि उपअधीक्षक हुमायून भट गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. भट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे, तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक गुलाम हसन भट त्यांचे वडील आहेत. पाकिस्तानस्थित लष्कर- ए-तैयबाचा गट मानल्या जाणाऱ्या प्रतिबंधित रेझिस्टंस फ्रंट ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम