यंदाचा बैलपोळ्याला लंपीच्या प्रार्दुभावासह दुष्काळाच्या सावटाखाली !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील बळीराजासाठी सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे बैल पोळा. या सणाला अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदा महागाई सोबतच लंपीच्या प्रार्दुभाव व दुष्काळाच्या सावटाखाली साजरा होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर विस ते तीस टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारी शहरात भरलेल्या आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने सजली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत दुकानदारासह खरेदीदारांची गर्दी जेमतेम असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणावार्या बैल तथा अन्य जनावरांना दरवर्षी पोळा सणाला नवीन साज, साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करावीच लागते. मात्र यावर्षी महागाईमुळे शेतकरी बांधव बाजाराकडे विरळगतच दिसत असुन यात अनेकांनी बैल सजावट साहीत्य घेण्यासाठी पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळत आहे. यंदा परिसरात २८ जूनपासून गायब झालेल्या पावसामुळे खरिप पिकांची स्थिती नाजूक बनली होती. पण मागील आठवडयात दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीस हास्य फुलले आहे. मात्र नदी नाले विहीरी,तलाव यांना अजुनही नवे पाणी न आल्याने पैसा खर्च करण्यासाठी अनेकांनी आखडता हात घेतलेला आहे. तर परिसरात मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टरचा प्रत्येक कामांसाठी उपयोग वाढल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होऊन सणाची व्यापकताही कमी झाली. त्यामुळे साजश्रृंगाराच्या सहित्याला परिणामी शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे साहित्य विक्रेते आकाश गौतम यांनी सांगितले. पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते. पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांचे खांदे तूप व हळदीने मळणी केले जाते. सलग दोन ते तीन दिवस बैलांना शेम्पु साबणीने आंघोळ घालून त्यांना पुरणपोळी व नैवेद्य भरवला जातो. दरम्यान, खरीपाच्या उभ्या पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम