दिवाळीत पावसात घ्या फटाके फोडण्याचा आनंद

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ ।  येत्या काही दिवसावर दिवाळी सण तोंडावर येवून ठेपला आहे. यातच राज्यात हवामान खात्याने पावसाचा कहर या दिवाळीत होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने यंदाचे दिवाळीतील फटके कसे फोडणार, आता बच्चे कंपनी तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारणार आहे.

बंगालच्या उपसागरात 20 आणि 21 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून, महाराष्ट्रावर 23 व 24 रोजी हे वादळ घोंगावणार आहे. त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सीतरंग चक्रीवादळाचे मार्गक्रमण कसे असेल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या वादळाचा परिणाम म्हणून 23 आणि 24 ऑक्टोबरला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. दिवाळीचा सण तोंडावर असून हिवाळा हंगामही सुरू झाला. मात्र, महाराष्ट्रात पाऊस थांबता थांबत नाही. आता याच पावसाचा ऐन दिवाळीत जोर असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. कोकणमध्ये आज महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिण भाग विदर्भात तुरळ ठिकाणी वीज व मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तम अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. गुरुवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्यकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
चक्रीवादळ आणि पाऊस या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सध्या एकीकडे राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार होत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात दमदार पाऊस झाला. नगर आणि पुणे जिल्ह्यातील पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. तर राज्यातही अतिवृष्टीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम