शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठे कोण ; नितेश राणेंचे ट्विट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ । राज्याच्या राजकारणात पुन्हा एका जाहिरातीवरून वादाची ठिणगी पडली आहे. ती म्हणजे आ.रोहित पवार यांनी गड किल्ले बांधणीची स्पर्धा आयोजित केली आहे. या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची साईज कमी आहे व शरद पवार यांचा मोठा फोटो लावल्याने शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठे कोण, असा सवाल भाजप नेते नीतेश राणे यांनी ट्विट करत रोहित पवारांना विचारलाय.

ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही स्पर्धा होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. रोहित पवारांनी गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची तारीखही अजून जाहीर झालेली नाही. मात्र, या स्पर्धेसाठी केलेली जाहिरातमुळे वाद निर्माण होताना दिसतोय. ही जाहिरात नीतेश राणे यांनी ट्विट केलीय. या जाहिरातीतील फोटोच्या मांडणीमुळे वाद उदभवला आहे.

जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गड किल्ले बांधणी महास्पर्धा 2022 चे लवकरच आयोजन करण्यात आले आहे. या जाहिरातीवर सर्वात वर शरद पवारांचा फोटो आणि त्या खाली छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. या मांडणीला राणे यांनी आक्षेप घेतला आहे.

नीतेश राणी यांनी फक्त एक ओळीचे ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठे कोण? या ओळीखाली त्यांनी जाहिरातचे चित्र पोस्ट केले आहे. दरम्यान, यावर अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कसलेही उत्तर आले नाही. ही जाहिरात खरेच राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय की, आणखी कोणी यालाही दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, तूर्तास तरी ऐन दिवाळीपूर्वी वादाचा नवा विषय मिळालाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम