शिंदे सरकारने दिले सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट : या दिवशी मिळणार पगार व बोनस

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यातील शिंदे सरकारने दिवाळीच्या सणानिमित राज्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व पगार दिवाळीच्या पूर्वी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

BJP add

महाराष्ट्र राज्य शासनाकडुन राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळी सणाच्या अगोदर म्हणजेच दि. 24 ऑक्टोंबरपुर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरला वेतन देण्याची मान्यता देण्यात आली आहे. यंदा दिवाळी ही 22 तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी म्हणजे 21 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 22 हजार 500 रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे. राज्य शासनातील सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी 12 हजार 500 एवढी रक्कम दिली जाणार असून 10 समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम