निकालापूर्वीच शिंदे गटाचे ते मंत्री ठाकरेंच्या संपर्कात ; नेत्याचा दावा !
दै. बातमीदार । ११ मे २०२३ । राज्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पूर्वीच शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची गोप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले आमदार आणि आताचे मंत्री उदय सामंत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
खैरे म्हणाले की, उदय सामंत हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कारण, उदय सामंत हे सर्वात शेवटी शिंदे गटात गेले होते. त्यामुळे १६ अपात्र आमदारांमध्ये उदय सामंत यांचा समावेश करण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील अनेक आमदार फुटणार आहेत. ते पु्न्हा आमच्यासोबत येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल, हे माहिती नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास देखील चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम