माजी मंत्री देशमुखांना दिलासा नाहीच ; सुनावणी पुढे ढकलली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ नोव्हेबर २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत आहे. यांच्या जामिनावरील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे देशमुखांचा आजही जामीन मिळू शकला नाही. आज उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत सुनावणी शुक्रवार, 2 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. सीबीआयकडून बाजू मांडणारे अॅड. अनिल सिंह प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज उपस्थित राहू शकले नाहीत. एका अर्जाद्वारे त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली.

सुनावणी पुढे ढकलण्यास अनिल देशमुखांच्या वकिलांनी तीव्र विरोध केला. तपास यंत्रणा केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप देशमुखांच्या वतीने करण्यात आला.

सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात देशमुखांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. मात्र, याच प्रकरणाशी संबंधित ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानं सीबीआयने प्रकरणात जामीन न देणे चुकीचे असल्याचा दावा देशमुखांकडून करण्यात आला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी देशमुख यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. 100 कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयने देशमुखांच्या कोठडीची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम