
सध्या तुमच्या मताला किंमतच नाही ; अंधारेंचा वाघांवर पलटवार
दै. बातमीदार । २९ नोव्हेबर २०२२ । चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंवर नक्कल करून टाळ्या मिळवत असल्याची टीका केली. ”प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमची नक्कल करून त्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळवतात. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काहीही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू, असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे नाव घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.” यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.
स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या अशी प्रखर टीका भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली. त्यांनी याबाबत एक ट्वीट करून ”अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाही..!” असे जोरदार प्रत्युत्तरही चित्रा वाघ यांना दिले.
चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर सुषमा अंधारेंनी ट्वीट करून खोचक प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ”स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाणसारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे”
अरेच्चा विसरलेच!
चित्रा वाघ यांना ट्विटद्वारे सल्ला देताना अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्रही सोडले. ”अरेच्च्या.. विसरलेच.. सध्या तुमच्या मताला किंमतच नाही” असे ट्विट करून अंधारेंनी वाघ यांच्या टीकेला सहज घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम