सरकारमधील ५ मंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय विस्तार नाहीच ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून हि झालेला नसल्याने अनेक विरोधकात सत्ताधारीवर टीका करीत आहे. तर दुसरीकडे राज्यातील शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड व गुलाबराव पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्याशिवाय राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आग्रही आहेत. विशेषतः अब्दुल सत्तारांविषयी केंद्रात प्रचंड नाराजी आहे. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

गत काही महिन्यांपासून शिंदे – फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी वेगवेगळ्या तारखा सांगण्यात येत आहेत. पण अद्याप त्याला मुहूर्त मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपरोक्त मंत्र्यांचा उल्लेख करत त्यांच्या हकालपट्टीशिवाय मंत्रिमंडळ विस्तार शक्य नसल्याचा दावा केला आहे.

अमित शहांनी शिंदेंना स्पष्ट सांगितले आहे की, अब्दुल सत्तार, संजय राठोड, संदिपान भुमरे, तानाजी सावंत व गुलाबराव पाटील या वादग्रस्त मंत्र्यांना आवर घाला किंवा त्यांची हकालपट्टी करा. त्याशिवाय आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत, असे अमोल मिटकरी यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. अमित शहांच्या भूमिकेमुळे शिंदेंच्या 5 मंत्र्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भाजपकडून मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यादिवशी दोन्ही पक्षांत अक्षरशः मारामाऱ्या होतील, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. केंद्रीय पातळीवर अब्दुल सत्तारांविषयी तीव्र नाराजी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम