“उद्धवजी ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा ; केद्रीय मंत्री !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. डबल इंजिनचं सरकार फक्त हवेत वाफा सोडतंय असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून उद्धव ठाकरेंच्या भूमिकांवर भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. यासंदर्भात मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, पालघरमधील घटनेचा उल्लेख करून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. “केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. हिंदूंची फसगत झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार देश चालवायला लायक नाही हेच त्यावरून स्पष्ट होते. डबल इंजिन सरकार केवळ हवेतच वाफा सोडत असून राज्यातही गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या छाताडावर पुन्हा भगवा फडकावणारच”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“उद्धवजी ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. आख्ख्या जगानं मान्य केलंय की जगातल्या १६० देशांना औषध व लस पोहोचवण्याचं काम भारतानं केलंय. देशात २२० कोटी लसी मोफत देण्याचं काम मोदींनी केलं आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. घाबरत होता. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता”, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम