रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरात सूट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ ऑक्टोबर २०२२ । वाशिम जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता जिल्ह्यासाठी सन २०२२ या वर्षात १० दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीची विविध मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास जिल्हादंडाधिकारी,वाशिम यांनी सूट दिली आहे.

BJP add

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक आज १ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वापराकरिता सूट देण्यात येत आहे.

ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही,त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या.मा.उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनिप्रदूषण संबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबीचे तंतोतंत पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी.

सदर दिवसाकरीता सुट राज्य शासनामार्फत घोषीत शांतता क्षेत्रात लागू नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक यांची राहील. अशा प्रकारची परवानगी देतांना ध्वनी प्रदुषण नियम २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करण्यात यावे.ध्वनी प्राधिकरण यांनी त्यांचेकडे प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशात नमुद विहित पध्दतीने कार्यवाही करावी. ध्वनी प्राधिकारी यांनी ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम २००० मध्ये दिलेल्या सर्व अटी व शर्तीच्या अधिन राहूनच कार्यवाही करावी. असे जिल्हादंडाधिकारी, वाशिम यांनी आदेशात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम