शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
इंग्रजी शाळेतील शिक्षकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय नववीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची तक्रार दौलताबाद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दौलताबाद पोलिसांनी शिक्षक अजय जयवंत सासवडे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. माळीवाडा येथील पीडित विद्यार्थिनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील इंग्रजी शाळेत शिकत होती. तक्रारीनुसार, अजय सासवडे याने १४ जानेवारी ते १७ मे या कालावधीत सतत संदेश पाठवून तिच्यावर प्रेमसंबंधांचा दबाव टाकला. यामुळे त्रस्त होऊन तिने १७ मे रोजी आत्महत्या केली. या घटनेची तक्रार मृत विद्यार्थिनीच्या आईने केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम