तब्बल वीस लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त
बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात बनवत मद्याचा साठा अनेक जिल्ह्यात आढळून येत असतांना अशीच एक कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभागाने केली आहे. धुळे तालुक्यातील आर्वी, ठोंबऱ्या शिवारात बनावट दारू बनविण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुक्ल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने केलेल्या कारवाईत एका पत्र्याच्या शेडमधील बनावट दारूचा तब्बल वीस लाखांचा साठा जप्त केला असून, एका संशयित तरुणास ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने बुधवारी (दि. २२) आर्वी, ठोंबऱ्या शिवार, ताथुळे याठिकाणी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला असता बनावट देशी दारू कारखान्यात बनावट देशी दारू तयार करण्याकरिता वापरलेले साहित्य व द्रव्य स्पिरिट ६०० लिटर तयार ब्लेंड ३०० लिटर बनावट देशी दारू ६३९ मि.लि. (७१ बॉक्स) इलेक्ट्रिक ब्लेंडिंग मशीन एक इलेक्ट्रिक मोटर, बाटली बुच सील करण्यासाठी वापरण्यात येणारे एक ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, देशी दारू तयार करण्याकरिता लागणारे १५०० मि.ली इसेन्स देशी दारूची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे एक हायड्रोमीटर, थर्मामीटर, चंचुपात्र, बनावट देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आदी साहित्यासह १९ लाख १६ हजार १८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत पथकाने आर्वी येथील संशयित आरोपी गणेश शिंदे (वय ३०) यास ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सुनील चव्हाण, डॉ. बा. ह. तडवी, मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए. जी. सराफ, व्ही. बी. पाटील, जवान भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर, धनराज पवार, महेश सातपुते यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत निरीक्षक मालेगाव विभागाचे दुय्यम निरीक्षक कडभाने, इंगळे, जवान पानसरे, गाडे, अस्वले, पालवी, धनवटे आदींनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास ए. जी. सराफ करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम