
दै. बातमीदार । १३ फेब्रुवारी २०२३ । आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, देशांतर्गत वायदे बाजारात सोन्यामध्ये किंचित मजबूती दिसून येत आहे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सचे दर 29 रुपयांच्या मजबूतीसह 56, 770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहेत. त्याच वेळी, MCX वर मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सचे दर 396 रुपयांच्या घसरणीसह 66,268 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.
इथे हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सचे दर 56,741 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. त्याचवेळी मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सचे दर किलोमागे 66,664 रुपयांवर बंद झाले होते.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 6.00 डॉलर्सने घसरून 1,859.59 डॉलर प्रति औंस वर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.17 टक्क्यांनी घसरून $ 21.84 प्रति औंस वर ट्रेड करत आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,500 रुपये
पुणे – 52,500 रुपये
नागपूर – 52,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 57,230 रुपये
पुणे – 57,230 रुपये
नागपूर – 57,230 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम