
गौतमी पाटीलने मागितली अजित दादांची माफी !
दै. बातमीदार । १३ फेब्रुवारी २०२३ । राज्यात सोशल मिडीयाच्या व आपल्या नृत्यामुळे चर्चेत आलेली गौतमी पाटीलवर अजित दादानी राष्ट्रवादीच्या कुठल्याच कार्यक्रमाला बोलवायचे नाही असे सांगितल्यावर गौतमी पाटील यांनी थेट दादांची माफी मागितली आहे. त्यासोबतच अजित पवारांनी हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार असे म्हटले होते. यावर गौतमी पाटील हिने मी पूर्वी चुकले आणि त्यासाठी वारंवार माफी मागितली, आता ती चूक मी परत करणार नाही, दादा मला माफ करा, असे म्हणत हात जोडत विरोधी पक्षनेते अजित पवार यांची माफी मागितली आहे.
नृत्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना सध्या रंगताना दिसत आहे. कारण मेघा घाडगे यांनी अजित पवार यांच्याकडे गौतमी पाटीलची तक्रार केली होती. तर अजित पवारांनी सया तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गौतमीचे कार्यक्रम आयोजित करु नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
गौतमी पाटील म्हणाल्या की, माझे जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल केले जात आहे, हे चुकीचे आहे. माझ्या राती अर्ध्या राती हे गाणे सादर करताना माझ्याकडून खूप चुका झाल्या, त्या मी मान्य करते आणि त्याबद्दल मी जाहीर माफीदेखील मागितली आहे. मात्र माझ्या चुका सुधारून मी आता तसे हातवारे किंवा हावभाव करत नाही, असे म्हणत गौतमी पाटील हिने अजित पवारांनी बंदी आणि विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याच्या इशाऱ्यानंतर पवारांची हात जोडून माफी मागितली आहे. मी या आधी काही चुका केल्या. मात्र, लोकांनी हे सर्व माझ्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मी त्या सर्व चुका सुधारल्या आहेत. तेव्हापासून मी अश्चील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकले असेल तर दादा मला माफ करा असेही तिने म्हटले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम